07 January 2016

#ट्विटरसंमेलन आणि ईबू

#ट्विटरसंमेलन आणि ईबू


आपला ईबू आता जरा बाळसं धरू लागला आहे हां.

ट्विटर वर सुरु होणाऱ्या पहिल्या वहिल्या #ट्विटरसंमेलनात सामील होणाऱ्या चांगल्या कवितांचे व लेखांचा एक सुंदर शाब्दिक गुच्छ तयार होणार आहे. 
ज्याला अर्थांचा दरवळ असेल आणि भावार्थाची मस्त झालर असेल.
तंत्रज्ञान वापरून आपण आधुनिक काळात देखील साहित्याशी असेलेली बंधीकली जपत आहोत ह्याचे द्योतक म्हणजे #ट्विटरसंमेलन.


१५ ते १८ जानेवारी २०१६-

ह्या दिवशी पुण्यात 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' असणार आहे. त्याच वेळी जगभरात मराठी साहित्याचा जागर होत असेल दिवस-रात्र. आणि ह्या लेखांचा आणि कवितांचा आस्वाद शब्द रुपात आणि चित्र-ध्वनी रुपात संकलित करून ठेवण्याची जिम्मेदारी 'ईबू पब्लीकेशन्स'ने घेतली आहे.

आयोजकांना केलेल्या विनंतीस त्यांनी मान दिला यासाठी त्यांचे आभार. 

'ईबू' ची यु-ट्यूब वाहिनी

जगातील ह्या पहिल्याच ट्विटरसंमेलनाचे औचित्य साधून आम्ही आमची 'ईबू' वाहिनी सुरु करीत आहोत. 

उद्येश्य- नवीन कलाकार, काव्य, गायन, कथा कथन, नाट्य प्रयोग व अशा अनेक मार्गांनी लोकांची स्वप्ने जगभर पोचवणे.


#ट्विटरसंमेलन कसे सहभागी व्हाल?


सूचना: 

१) कविता व कथा कथनासाठी स्वतंत्र  व्हिडीओ असावेत
२)  एक कविता - एक व्हिडीओ
३) एक कथा- एक व्हिडीओ 
४) कवितांसाठी व कथांसाठी गट असतील.
५) वेळेची मर्यादा पाळणे आवश्यक- 
कविता गट १- '२ मिनिट किंवा कमी' 
कविता गट २- '२ ते ४ मिनिट'
कथा- गट १- किमान ३ मिनिट
कथा- गट २- ३ ते ८ मिनिट

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. 
काही बदल झाल्यास #ट्विटरसंमेलनवर घोषित केले जातील.  

हा ब्लॉग सबस्क्रायब केल्यास अद्ययावत माहिती मिळत राहील.

लोभ असावा. 



No comments:

Post a Comment