09 March 2016

बदलते वाचन आणि ईपुस्तकांचे युग


लोकांनी टाईप राईटर्स च्या ऐवजी संगणकाला का निवडले? घरातल्या ट्रिंग ट्रिंग वाजणाऱ्या दूरध्वनी ऐवजी भ्रमणध्वनी का सरस झाले? आणि आता भ्रमणध्वनीलाही मागे टाकत ‘कुशाग्रध्वनी’( स्मार्टफोन) वरचढ झाले. हे असे का झाले? कारण येणाऱ्या प्रत्येक संशोधनाने संभावना ‘निर्माण’ केल्या, उपलब्ध तंत्रज्ञानाच्या मर्यादांना इतिहासजमा केले. या नव्याने निर्माण झालेल्या संभावनांचा परीघ वाढवत जाण्यासाठी उपभोक्त्याला ‘सक्षम’ केले गेले. उपभोक्त्यांना त्यांच्यात असलेल्या सृजनशीलतेला तंत्रज्ञानाची साथ मिळाली.

अशाच अजून एका सीमोल्लंघनाचे आपण साक्षीदार होत आहोत. मानवीसंस्कृतीची ओळख असणाऱ्या सृजनतेचे जे तीन सर्वोच्च मानबिंदू आहेत, त्यांच्याशी संबंधित. एक भाषा, दुसरे संगीत, आणि तिसरे तंत्रज्ञान. जगात जितके संशोधन भाषेवर झाले आहे किंवा होते आहे त्यापेक्षा अधिक फक्त एकाच गोष्ट आहे ती म्हणजे ब्रह्मांडांची पोकळी. मानवी संस्कृतीत भाषेला मूळ संशोधन मानले गेले पाहिजे. कारण त्याशिवाय इतका विकास आणि इतकी बौद्धिक उत्क्रांती शक्य नव्हती. आणि या ‘भाषेवरील’ प्रयोग करणाऱ्या प्रयोगशाळा किती असतील? तब्बल सात  अब्ज मिनिटाला चार प्रयोगशाळा तयार होत आहेत.

आता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या प्रयोगशाळांना बौद्धिक, वैचारिक, सात्विक, मनोरंजक, आणि तात्विक अशा अनेक प्रकारची रसद पुरवठ्याचे सर्वात महत्वाचे साधन आहे ‘पुस्तक’.

पण हल्ली ‘अम्ही वाचन करतो’ म्हणजे पुस्तके, कथा कादंबरी, गोष्टी, किंवा वर्तमानपत्रे वाचणे असा राहिलेला नाही. लोकं खूप वाचत आहेत. आधीपेक्षा जास्त. लाखो ट्विटस, स्टेट्स अपडेट्स, फोरवर्डस, मेल, ब्लॉग्स आणि ‘असे तसे’ बरेच काही वाचले जाते. फक्त त्याचात ‘शिघ्रानुभूती’ (क्विकनेस ऑफ एक्सप्लोरेशन) प्रचंड वाढले आहेत. पण हे एका ठराविक वायोमार्यादेला डोळ्यांसमोर ठेवून केलेले मत आहे. आजही असंख्य वाचक पुस्तक प्रेमात न्हाऊन निघण्याच्या आनंदाचा अनुभव दर दिवशी घेत आहेत.

पण झाले असे आहे कि. बदलत्या राहणीमानाला आणि एकंदरीत जगण्याला आलेल्या व्यस्त जीवनशैलीला ‘पुस्तक वाचण्याच्या छंदाला अनेकांना बगल द्यावी लागते. शहरातील गर्दी, आणि एकंदरीत पुस्तकांच्या जागा व्यापण्याच्या गुणधर्मामुळे हवी तेवढी पुस्तके हवी तेव्हा, हवे तिथे घेऊन जाण्याला मर्यादा येतात. व पुन्हा वाचनाशी दुरावा येतो.



पण पुस्तकप्रेमी व वाचकांच्या भौतिक रुपी मर्यादांच्या ह्या अडचणींचा आता अंत होत आहे. अंत सुरु झाला आहे. कारण आता तुम्ही हवं तेव्हा कितीही वाचू शकता, तुमच्या आवडीची पुस्तके, आणि तीही हव्या त्या वेळी. गरज आहे ती फक्त एका ‘कुशाग्रध्वनी’ किंवा एका ‘ई-रीडर’ ची.

EPUB या स्वरुपातीला ई पुस्तके तुम्हाला वाचनाचे स्वातंत्र्य देते आहे. सध्या वापरात असणाऱ्या व दिवसेन दिवस कमी होत जाणाऱ्या PDF स्वरूपाच्या ई पुस्तकांच्या मर्यादांना इतिहास जमा करत EPUB स्वरूपातील ईपुस्तके संभावना वर्धक व उपभोक्त्याला अधिक सक्षम व त्यांना अधिक नियंत्रण 
अधिकार प्रदान करतात.

उदाहरणार्थ –

  1.       EPUB ई पुस्तके कोणत्याही आकाराच्या स्क्रीनवर स्वतःला प्रदर्शित करते, म्हणजे PDF मध्ये असणारी झूम करून ओळ्या पकडत चण्याच्या त्रासातून मुक्तता.
  2.        EPUB पुस्तके ‘रात्रप्रणाली’ (नाईट मोड) मध्ये देखील वाचता येतात.
  3.        EPUB पुस्तके ‘अक्षररूपे’ (फाँट) बदलण्याचे स्वातंत्र्य देतात.
  4.       EPUB पुस्तके ‘अक्षरमापे’ (फाँट साईज) बदलण्याचे स्वतंत्र देतात. झूम करून स्क्रीनवरची जी सरकवण्याची ओढतान असायची ती संपते. जवळचे अक्षर दिसण्यास अडचण असणाऱ्या लोकांना सर्वोत्तम. भिंग फेकून द्या.
  5.       EPUB पुस्तके आभासी पानांचा अनुभव देतात.
  6.      EPUB पुस्तकात एखाद्या आवडलेल्या मजकुराचे संकलन, किंवा शेअर करणे, इंटरनेट वर अर्थ शोधणे, असे बरेच काही करता येते.
  7.      EPUB पुस्तके तुमच्यासाठी स्वतःला वाचू देखील शकतात. मस्त डोळे बंद करून कथा वाचू नका तर चक्क ऐका.
  8.      हे तंत्रज्ञान अजून विकसित होत जाणार आहे. 
याच तंत्रज्ञानाचा वापर करून EBOO तुमचे ईपुस्तक प्रकाशित करते. वाचनच नव्हे तर प्रकाशन देखील सुखकर करता येते हेच आमच्या प्रयत्नांतून जाणवेल आपणाला. 

त्वरित संपर्क करा. 
तुमचे ईपुस्तक जगभर जाईल, सदैव राहील.


No comments:

Post a Comment